बदलापूर:- गुरुवारी सायं.वृत्त पत्र लेखक व साहित्यिक अनिल
पालये यांच्या घरी,`संस्कार जिज्ञासा` ह्या पुस्तकाचे ऑन लाईन प्रकाशन
संपन्न झाले.आदर्श संस्थेतून सेवा निवृत्त झालेले,सुरेश
ब्रम्हपुरीकर सर यांनी पुस्तक प्रकाशीत करताना,आजच्या परीस्थितीत संस्काराचे महत्व विशद केले.सुविचार,सामान्यज्ञान,सना वळी,सत्संग,सुभाषित
अशा सकारात्मक विचाराने समृद्ध पुस्तक प्रेरणादायी आहे,असे म्हटले.व
संपादक पालये यांना शुभेच्छा दिल्या.संपादक अनिल पालये यानी मनोगत व्यक्त
केले.ते म्हणाले,मुंबई येथील एक सामाजीक कार्यकर्ते,रामभाऊ बेलवलकर यानी
केलेल्या नोंदी व वृत्तपत्रीय कात्रणे याचे संकलन करुन हे पुस्तक ७
वर्षापूर्वी अंधरी-मुंबई येथे,डॉ.बापु देसाई गौरव सोहळ्यात प्रकाशीत केले
होते.वाचकांचा चांगला प्रातिसाद लाभल्याने,दुसरी आवृत्ती काढावी
लागली.हरिश्चन्द्र प्रकाशनाच्या वतीने,आसावरी उपस्थित होत्या.शंतनु वाडेकर
ह्यानी तांंत्रिक बाजु सांंभाळली.